बेरोजगारी ही भारतातील सध्याच्या काळात सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र हे बेरोजगारीच्या समस्येने ग्रासलेल्या राज्यांपैकी एक आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजनांची गरज आहे.
आम्ही 'मी बेरोजगार' ही एक ऑनलाइन याचिका सुरू केली आहे जी बेरोजगारीच्या समस्येवर लक्ष वेधण्याचे काम करत आहे आणि सरकारला रोजगार निर्मितीसाठी धोरणे तयार करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. या याचिकेवर तुमच्या स्वाक्षरीने तुम्ही युवांच्या या लढ्यात सहभागी होऊन ह्या चळवळीला हाथभार लावू शकतात.
याचिकेवर सही करण्याचे उद्दिष्टे:
१) बेरोजगारीच्या समस्येवर लक्ष वेधणे.
२)धोरणात्मक उपाययोजनांसाठी सरकारला प्रोत्साहित करणे.
३) युवांमध्ये जागृती निर्माण करणे.
कसे सहभागी व्हावे? : तुमची माहिती भरून, Certificates डाउनलोड करा आणि तुमच्या मित्रांनाही यात सहभाग नोंदवायला प्रोत्साहित करा.
बेरोजगारीचं पाश, तोडूया हाच ध्यास!